विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा केला आहे. दोषींना १० वर्षे पर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. या तरतुदी आजपासून लागू होत असल्याचं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA, रेल्वे भरती आणि बँकिंग भरती परीक्षा अशा विविध सार्वजनिक परीक्षांमध्ये होणार्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी या तरतुदी लागू असतील.
Site Admin | June 22, 2024 7:18 PM | कायदा | स्पर्धा परीक्षा