डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सौर्य एअरलाइन्सच्या विमान अपघातात 18 जणांचा मृत्यू

काठमांडूहून पोखराकडे निघालेल्या सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला काल सकाळी झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या पूर्वेकडे असलेल्या खंदकात – विमान उड्डाण करत असताना लगेचच कोसळलं आणि विमानाला आग लागली. विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाल्याचं नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानं सांगितलं. अपघातानंतर मृतदेह त्रिभुवन विद्यापीठाच्या अध्यापन रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात वाचलेला फ्लाइट कॅप्टन मनीष रत्न शाक्य, सध्या सिनामंगल इथल्या केएमसी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा