सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले आहेत. ज्या अर्जदारांची माहिती अपुरी आहे किंवा पूर्ण दस्तऐवज नाहीत, त्यांना पारपत्र जारी करण्यासाठी भ्रष्टाचार आणि गैरप्रकार करण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. यात मुंबईतल्या लोअर परळ आणि मालाड इथल्या पारपत्र सेवा केंद्रांमधले १४ अधिकारी १८ दलालांचा समावेश आहे. याप्रकरणी २६ जूनला सीबीआय आणि दक्षता अधिकाऱ्यांनी मुंबई आणि नाशिक इथं ३३ ठिकाणी शोधमोहीम राबवली होती.
Site Admin | June 29, 2024 7:31 PM | भ्रष्टाचार | सीबीआय
सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले
