सार्क देशांमधल्या चलन अदलाबदल सुविधेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं नवीन सुधारित चौकट लागू केली आहे. या सुधारणेनुसार, २०२४ ते २०२७ या काळात ज्या सार्क देशांच्या मध्यवर्ती बँका चलन अदलाबदल सुविधेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांच्याबरोबर द्विपक्षीय करार केले जातील. या सुविधेसाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे.
Site Admin | June 28, 2024 2:46 PM | RBI