डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत.  पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या देहरा आणि नलगढ मतदारसंघात काँग्रेसच्या, तर हमीरपूरमध्ये भाजपा उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, बागडा, रणघाट दक्षिण, आणि मणिकताल या चारही मतदारसंघांमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशातल्या अमरवाडामध्ये भाजपा, तर उत्तरखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलौरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले. बिहारच्या रुपौली इथं अपक्ष उमेदवार शंकर सिंह विजयी झाले असून, तमिळनाडूतल्या विक्रवंडीमध्ये द्रमुकच्या उमेदवारानं विजय मिळवला आहे. १० जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा