राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आज मुंबईत सर्वपक्षीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या प्रकरणी राज्य सरकारनं विरोधकांना विश्वासात न घेतल्यानं महाविकास आघाडी बैठकीला जाणार नाही. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनतेला कळलं पाहिजे. राज्य शासनानं आरक्षणप्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करावी, अशी मागणी विधानसभेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
Site Admin | July 9, 2024 7:50 PM | महाविकास आघाडी | विजय वडेट्टीवार | सर्वपक्षीय बैठक
सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय
