देशाच्या तिन्ही सेनादलांची वित्तीय परिषद आज नवी दिल्लीत संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षते खाली होत आहे. संरक्षण दलांसाठीचा वित्तपुरवठा, आणि इतर वित्तविषयक बाबींमधे तिन्ही दलांचा ताळमेळ राखण्यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. या उच्चस्तरीय परिषदेत संरक्षण मंत्रालयातले वरीष्ठ अधिकारी, संरक्षण लेखा विभागाचे वरीष्ठ अधिकारी सहभागी होतील. संरक्षण विभागाच्या आर्थिक बाबींशी संबंधित विविध घटकांचा दृष्टीकोन समजून घेणं आणि संरक्षण सामग्री खरेदीतल्या समस्यांवर तोडगा शोधणं अशा मुद्द्यांवर या परिषदेत विचारविनिमय होणार आहे.
Site Admin | August 5, 2024 8:34 PM