भाजपाचे दोन खासदार काल जखमी झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात आंदोलन केलं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप या खासदारांनी केला. नागालँडमधल्या खासदार फगनॉन कोन्याक यांच्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी या खासदारांची मागणी होती.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्य्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेल्या FIR चा त्यांनी निषेध केला.