डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सदस्य संख्येत वाढ करण्याची भारताची मागणी

 
 
सध्याची जागतिक आव्हानं प्रभावीपणे पेलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या  सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्य संख्येत वाढ करून सुरक्षा परिषदेत सुधारणा करायला हव्यात, अशी मागणी भारतानं केली आहे. पुढच्या वर्षी  संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला  ८० वर्ष पूर्ण होत  असून सुधारणांसाठी हीच योग्य वेळ असल्याचं भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथुर यांनी सांगितलं.
 
 
सुरक्षा परिषदेवरच्या वार्षिक अहवालावर आमसभेत झालेल्या चर्चदरम्यान त्यांनी भारताची भूमिका मांडली. सध्या १५ सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य असून केवळ त्यांनाच व्हिटोचा अधिकार आहे तर १० देश दोन वर्षांसाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडले जातात.
 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा