संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. या संपूर्ण पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या आरोग्याची वारी- पंढरीच्या वारी या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ४६ हजार ८१३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे.पालखी मार्गावर वारकऱ्यांना जिल्हा परिषदेकडून सर्व सुविधा दिल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य विषयक सेवा सुविधा, आरोग्य शिक्षण, जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेकडून एकूण ४ आरोग्य पथकं सुसज्ज रुग्णवाहिकेसह पालखीसोबत आहेत. पालखी मार्गावर १८६ टॅंकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.
Site Admin | July 6, 2024 6:51 PM | ज्ञानेश्वर महाराज | तुकाराम महाराज पालखी | पंढरीची वारी