डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीनं प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरच्या पाणी पुरवठा योजनांची कामं मार्गी लावण्यासाठी अटी आणि शर्थींच्या अधीन राहून पाणी पुरवठा योजनांची कामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.