शांघाई सहयोग संघटना अर्थात एस सि ओ शिखर संमेलनादरम्यान, कझाकस्तानातील अस्ताना इथे काल केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची, भेट घेतली. या संमेलनात देशाचं प्रतिनिधित्व करताना, जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यारून चीन आणि पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. दहशतवादाला वेळीच आळा घातला नाही तर तो प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठा धोका ठरू शकतो असा इशारा जयशंकर यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे वाचन केलं, ज्यात, दहशतवादाशी लढा हे एससीओच्या मूलभूत उद्दिष्टांपैकी एक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या शिखर संमेलनाला चीनचे राष्ट्रपति शी जिन पिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते.