वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदातल्या सिद्धांतांचा अभ्यास करून या क्षेत्रात संशोधन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल वर्धा इथं केलं. वर्ध्याच्या दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या १५व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
या समारंभात वैद्यकीय, दंतविज्ञान, आयुर्वेद, भौतिकोपचार, परिचर्या, औषध निर्माणशास्त्र, पर्यायी उपचार शाखा आणि अन्य विद्याशाखेतल्या १ हजार ७२१ पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दीक्षांत प्रमाणपत्र मिळालं. विविध शाखांच्या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ७८ विद्यार्थ्यांना ११५ सुवर्ण, ७ रौप्य तर १३ कुलपती विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.