डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वीजदेयकांसंदर्भात केवायसी फसवणूक प्रकरणी कारवाई

वीजजोडणी तसंच वीजबिलासंदर्भात ग्राहकांनी आपली माहिती अर्थात KYC अद्ययावत करावी अशा प्रकारची फसवणूक फोनद्वारे होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर दूरसंचार विभागानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई सुरु केली आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीमध्ये गैरवापर झाल्याच्या तक्रारी असलेले, देशभरातील ३९२ मोबाइल संचांच्या सेवा बंद करण्याचे निर्देश सर्व दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत.या संचांशी जोडलेल्या ३१ हजार ७४० मोबाइल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देशही दुरसंचार मंत्रालयानं दिले आहेत. नव्यानं शहानिशा करताना त्रुटी आढळल्यास संबंधित मोबाईल आणि हँडसेटच्या सुविधा तत्काळ बंद करण्यात येतील असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा