विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने एका बनावट एक्स खात्यावरून चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
Site Admin | October 16, 2024 8:50 PM
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपी अटक
