डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

 

भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने शेकापाचे जयंत पाटील विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत.

 

विधानसभा सदस्यांमधून यापैकी ११ सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मत मिळवणे आवश्यक आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा