राज्यातल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत वाढलेलं साडेसात टक्के मतदान कसं वाढलं याचं निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
आम्हाला मतदान प्रक्रियाच संशयास्पद वाटत असून लोकांचीही अशीच भावना असल्याचं ते म्हणाले. राज्यात तब्बल ७६ लाख मतं वाढली असून संध्याकाळी साडेपाच ते साडेअकरा या वेळेत कुठे कुठे मतदान सुरु होतं याचे पुरावे आयोगानं द्यावेत असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात झालेल्या मतदान प्रक्रियेबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती व अर्थतज्ञ यांनीही संशय व्यक्त केला आहे असंही त्यांनी सांगितलं