विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. विधानसभेच्या आमदारांकडून या सदस्यांची निवड होणार आहे.
या निवडणुकीची अधिसूचना २५ जून रोजी जारी होणार असून २ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील. ३ जुलैला अर्जांची छाननी होईल आणि ५ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ दरम्यान मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.
मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी पूर्ण होत असल्यानं ही निवडणूक होणार आहे.