विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणवर्गाला केलं आहे. विकसित भारत ही चारस्तरीय स्पर्धा आहे. यात १५ ते २९ वयोगटातल्या व्यक्तीला भाग घेता येईल. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या डिजिटल प्रश्नमंजुषेने या स्पर्धेला सुरुवात होईल.
विकसित भारत हे लक्ष्य साध्य करण्यात तरुणांचा लक्षणीय सहभाग असायला हवा. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सरकारपर्यत पोचवण्यासाठी त्यांना मिळणारी ही मोठी संधी आहे असं सांगत, या स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे.