डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वायनाड दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी योग्य पावलं उचलली जातील – मुख्यमंत्री पिनरायी विजयन

केरळमधे वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी पावलं उचलली जातील असं, मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी सांगितलं. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

अडकून पडलेल्या अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती विजयन यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. आणखी बरेच लोक बेपत्ता आहेत, तसंच मलब्याखाली मृतदेह दबलेले असण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चूरलमाला इथं भेट दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा