वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, विदर्भ तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत, आठ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं या यात्रेची सांगता होणार आहे.
ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, एसटी एससी शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे, तसंच जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, या मागण्यांचा या यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.