सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटल्यांचा निपटारा झाला असून दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले असं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचं ७५ वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अंतिम दिन असून या निमित्त आयोजित कार्यक्रमात मेघवाल बोलत होते. या लोक अदालतीमुळे सर्वांना सुलभ, जलद, कमी खर्चिक न्याय मिळतो.