थोर स्वातंत्र्यसेनानी, भारताच्या स्वातंत्र्य प्रेरणेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि समाजसुधारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी संभाजी जाधव आणि मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेघदूत या शासकीय निवासस्थानी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.