लोकप्रतिनिधी गृहातल्या भाषणांबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारासाठी धाराशिव इथले भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची निवड झाली आहे.
सुजितसिंह ठाकूर यांना वर्ष २०१८-१९ करता महाराष्ट्र विधानपरिषद “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार जाहीर झाला आहे. ठाकूर यांनी मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्यातला सततचा दुष्काळ, पाणी टंचाई, कृष्णा खो-यातलं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, शेतीपंपाचा वीज प्रश्न, मराठवाड्याचं मागासलेपण, दरडोई कमी उत्पन्न, धाराशिव इथलं वैद्यकीय महाविद्यालय असे राज्यातल्या जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय प्रभावीपणे सभागृहात मांडले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते येत्या मंगळवारी मुंबईत विधानभवन इथं पुरस्कार वितरण होणार आहे.