लाओसमधील भारतीय दूतावासानं बोकिओ प्रांतातील गोल्डन ट्रँगल विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या सायबर घोटाळा केंद्रामध्ये अडकलेल्या 47 भारतीय नागरिकांची सुटका केली. या परिक्षेत्रामध्ये चाललेल्या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई केल्यानंतर लाओस अधिकाऱ्यांनी 29 लोकांना ताब्यात घेतलं, तर उर्वरित 18 लोकांनी थेट दूतावासाशी संपर्क साधला. लाओसमधील भारताचे राजदूत प्रशांत अग्रवाल यांनी सुटका करण्यात आलेल्या गटाची भेट घेतली आणि पुढील कार्यवाहीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.