लडाखमध्ये किमान तापमानात आणखी घट होऊन संपूर्ण भागात थंडीची तीव्र लाट आली आहे. भारत-चीन सीमेवरच्या न्योमा इथं पारा उणे २० अंश सेल्सिअसच्याही खाली घसरला आहे. तर तांगत्से इथं उणे १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, राजधानी लेह इथं उणे १२ पूर्णांक ६ अंश सेल्सिअस, तर करगिल इथं उणए १२ अंश सेल्सिअस तापमान आहे. उद्या या भागात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Site Admin | December 25, 2024 8:24 PM
लडाखमध्ये संपूर्ण भागात थंडीची तीव्र लाट
