लखनौ इथं आजपासून सुरू झालेल्या सैद मौदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे आघाडीचे भारतीय खेळाडू सहभाग घेत आहेत. या स्पर्धेचे सर्व सामने बाबू बनारसी दास मैदानावर होणार आहेत. पुढच्या महिन्याच्या १ तारखेला या स्पर्धेचा समारोप होईल. दरम्यान, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Site Admin | November 26, 2024 8:27 PM | Badminton