रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी कऱण्यासाठी केंद्रीय पथकाच्या भेटीनंतर राज्याने केंद्राकडे 237 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी तसेच वादळाने झालेल्या भूस्खलन तसेच मालमत्तेच्या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्याने मागणी केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मिझोरामला रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. गृह मंत्रालयाचे सहसचिव अभिजीत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक जीवितहानी आणि मालमत्ता, पिकांच्या नुकसानीचे मूल्याकनासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहे.
Site Admin | June 25, 2024 11:26 AM | #cycloneremal