भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या फ्रान्सच्या दौर्यावर असून काल त्यांनी पॅरिस इथ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युयल मॅक्रॉन यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावतीनं शुभेच्छा दिल्या. तसंच भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने 2047 पर्यंतच्या पथदर्शी आराखड्यातील तरतुदी प्रत्यक्षात आणण्याबाबत भारताची वचन बद्धता व्यक्त केली. जागतिक शांतता राखण्याच्या दृष्टीने आणि अनेक आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी भारत आणि फ्रान्स करत असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी मॅक्रॉन यांनी समाधान व्यक्त केल. तसंच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी स्तुती केली. दरम्यान, डोवाल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे धोरण सल्लागार एम्युयल बोने तसच संरक्षण मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्याशी ही काल चर्चा केली.
Site Admin | October 2, 2024 10:58 AM
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युयल मॅक्रॉन यांची भेट घेतली
