देशातील दूध व्यवसाय आणि दुग्धजन्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दिले जातात. यंदा या पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याच्या प्रक्रियेला १५ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज नॅशनल अॅवॉर्ड पोर्टलवर भरायचे असून, अर्ज भरण्याची अंतीम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे.
या पुरस्कारांचं वितरण २६ नोव्हेंबर ला असलेल्या राष्ट्रीय दुग्ध दिवशी केलं जाणार आहे. विविध विभागांसाठी हे पुरस्कार दिले जातात.प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह आणि दोन ते पाच लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.