राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सृजन २०२४ या दहा दिवसांच्या निवासी कला शिबिरात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या सुमित्रा आहके सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात सुमित्रा यांनी काढलेली वारली चित्रं, गाव आणि शहरातील फरक दर्शविणारं चित्र, देवस्वरुप मानला जाणारा वाघ आणि लुप्त होत चाललेले आदिवासी कलाप्रकार रेखाटले. शिबिरासाठी निवडलेल्या १५ जणांमध्ये सुमित्रा आहके यांना दुसरा क्रमांक मिळाला. शिबिराच्या समारोपावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी सुमित्रा आहके यांना प्रमाणपत्र, चषक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केलं.
Site Admin | November 5, 2024 7:35 PM | Amravati | President Draupadi Murmu