येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते, २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि सदस्यांना उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘ वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ‘ या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे, असं विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.