बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज राज्यभरात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाचा एक भाग म्हणून परभणीच्या विविध भागातल्या बैलांना सजवण्यात आलं होतं. त्यांची पूजा करून तसंच नैेवद्य दाखवून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.
हिंगोली जिल्ह्यातही भर पावसात बैलांना रंगरंगोटी करून, त्यांची पूजा करण्यात आली.
सध्याच्या आधुनिक यंत्रयुगात बैलांची संख्या रोडावल्यामुळं बुलढाणा जिल्ह्यात आज बैलपोळ्याऐवजी ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुमारे १५०-२०० ट्रॅक्टरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.