राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका असून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं ही काँग्रेसची प्राथमिकता असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसेल याचा निर्णय घेतला जाईल, असं पटोले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. युती सरकार हे महाभ्रष्ट सरकार असून त्यांनी राज्य विकायला काढलं आहे, महत्वाच्या जमिनी उद्योगपतींना कवडीमोल भावानं दिल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
Site Admin | August 14, 2024 3:56 PM | काँग्रेस | नाना पटोले
राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका आहे – नाना पटोले
