राज्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सोलापुरातल्या अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या कृतज्ञता मेळाव्यात ते आज बोलत होते. महिलांनी स्वावलंबी व्हावं यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण, वर्षभरात तीन मोफत सिलिंडर, आश्रम शाळेमधल्या १८ वर्ष वयापेक्षा मोठ्या मुलींना शुल्कमाफी, पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी अशा योजना शासन राबवत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.