डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सामान्य जनतेचा आहे – आमदार प्रवीण दरेकर

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, उपेक्षितांचा अर्थसंकल्प आहे, खोट्या गोष्टी पसरवणाऱ्यांचं तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान केलं. शेतकरी, महिला, वारकरी, बेरोजगार या समाजघटकांसाठी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या विविध योजनांचा पुनरुच्चार त्यांनी केला. सीमाभागातल्या मराठी शाळा, सहकार विभाग, शहरी बँका, गृहनिर्माण संस्था, तसंच रायगड पर्यटन आराखडा, कोकणासाठी निधी, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक इत्यादी मागण्याही दरेकर यांनी सरकारकडे केल्या. समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे याबद्दल सर्वत्र उत्साहाचं वातावरण असल्याचं दरेकर यांनी नमूद केलं.

 

विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा