युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आज सात नवीन स्थळांचा समावेश केला आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं भरलेल्या ४६ व्या जागतिक वारसा समितीच्या सत्रात हा समावेश करण्यात आला. यामध्ये जपानचं सदो बेट सोन्याच्या खाणी, चीनचं बीजिंग सेंट्रल ॲक्सिस, थायलंडचे फु फ्राबट ऐतिहासिक पार्क, रशियाचं केनोझेरो लेक लँडस्केप, केनियाचं ऐतिहासिक शहर आणि गेडीचे पुरातत्व स्थळ, दक्षिण आफ्रिकेतली नेल्सन मंडेला मानवी हक्कांसाठी लेगसी साइट्स, लिबरेशन अँड नॅशनल पार्क्स, लिबरेशन आणि रिकॉन्सिया पार्क लेणी संकुल, समितीनं निवडल्या आहेत. या सर्व स्थळांची निवड “सांस्कृतिक” श्रेणी अंतर्गत करण्यात आली.
Site Admin | July 27, 2024 8:12 PM | Unesco | World Heritage