युगयुगीन भारत संग्रहालय देशाचा आत्तापर्यंतचा प्रवास दाखवेल, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं युग युगीन भारत वस्तुसंग्रहालय या विषयावरच्या भारत-फ्रान्स क्षमता विकास कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी ते बोलत होते. हे संग्रहालय म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या संग्रहालयात दिसेल, असं प्रतिपादन शेखावत यांनी केलं. या संग्रहालयाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत आणि त्या दृष्टीनं सगळे प्रयत्न केले जात आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Site Admin | June 29, 2024 6:39 PM | गजेंद्र सिंह शेखावत | भारत-फ्रान्स | संग्रहालय