मुंबई मेट्रो लाईन ७ आणि २ए या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीनं संचालनासाठी सीसीआरएस, अर्थात रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तां कडून सुरक्षा प्रमाणपत्र आज प्रदान करण्यात आलं. त्यामुळे ५० ते ६० किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता ८० किमी प्रति तास या पूर्ण क्षमतेनं मेट्रोचं संचालन होईल.
मेट्रो लाईन ७ आणि २ए साठी मिळालेली नियमित मंजुरी हे मुंबईला कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसह जागतिक दर्जाचं शहर बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मेट्रो लाईन ७ आणि २एसाठी मिळालेली नियमित मंजुरी ही एमएमआरडीएच्या वचनबद्धतेचा दाखला आहे, असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.