डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 28, 2024 8:33 AM

printer

मुख्यमंत्रीपदाबाबत प्रधानमंत्र्यांच्या निर्णय शिवसेनेला मान्य – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही अडसर नाही, कसलीही नाराजी नाही असं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचं शिंदे यांनी सांगितलं.  

महायुतीच्या, राज्यातल्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीमधे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी भेट होणार आहे, त्यात सरकार स्थापनेबाबत निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना याला दुजोरा दिला. 

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद महत्वाचं नसून राज्यातल्या जनतेचं कल्याण महत्वाचं आहे, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा