डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली, तर निफ्टीनंही २४ हजार अंकांचा नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर सेन्सेक्स ५६९ अंकांची वाढ नोंदवत, ७९ हजार २४३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७६ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ४४ अंकांवर बंद झाला.

आजच्या कामकाजात सुमारे ३०० कंपन्यांच्या समभागांनी ५२ आठवड्यातला उच्चांक गाठला तर २६ कंपन्यांच्या समभागांनी ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी नोंदवली. 

ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि सिमेंट  क्षेत्रातले समभाग आज चढे राहिले तर उद्योग आणि भांडवली वस्तू क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज मंदीचं वातावरण दिसून आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा