मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदाच ८० हजाराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. कालच सेन्सेक्सनं ही पातळी ओलांडली होती, मात्र दिवसअखेर तो या पातळीखाली बंद झाला होता. आज दिवसअखेर ६३ अंकांची वाढ नोंदवत तो ८० हजार ५० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ३०२ अंकांवर बंद झाला.
Site Admin | July 4, 2024 7:35 PM | Mumbai Stock Market
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८० हजाराच्या उच्चांकी पातळीवर बंद
