डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 4, 2024 7:25 PM

printer

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत नवीन बटाटा यायला सुरुवात

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात कर्नाटकातून बेळगांव इथून नवीन बटाटा यायला सुरुवात झाली आहे. चवीला चांगला असल्यानं या बटाट्या ला नेहमीच बाजारात मागणी असते. मात्र, सध्या बाजारात जुना बटाटा अधिक असल्यामुळे जुन्या बटाट्याचे दर चढेच आहेत. जुना बटाटा प्रतिकिलो २४ ते २९ रुपये, तर नवीन बटाटा १० ते १८ रुपये दरानं उपलब्ध आहे.

 

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात बटाटा विक्रीकरिता येत असतो. अशातच आता बाजारात बेळगांवचा नवीन बटाटा येऊ लागला आहे. राज्यातून नवीन बटाटा गणपतीनंतर येऊ लागेल. त्यानंतर दर खाली उतरण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा