डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई उपनगरीय रेल्वेत येत्या ५ वर्षांमध्ये २५० नव्या रेल्वे धावणार

मुंबई उपनगरीय रेल्वे यंत्रणेची क्षमता वाढवण्याचं काम वेगाने सुरू असून येत्या ५ वर्षांमध्ये जवळपास २५० नव्या रेल्वे धावणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली.

 

उपनगरीय रेल्वे आणि दूरच्या पल्ल्याच्या गाड्यांच्या यंत्रणा वेगवेगळ्या करणं, त्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार करणं, दोन उपनगरीय रेल्वेमधलं अंतर १८० सेकंदांवरून कमी करून १५० सेकंदांवर आणण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. बाहेरच्या, लांब पल्ल्याच्या गाड्यांची ४ मेगा टर्मिनल तयार होणार असून कोस्टल रोड, मेट्रोमुळे उपनगरीय रेल्वेवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. रेल्वे सुरक्षेसाठी कवच यंत्रणा लवकरात लवकर देशभरात सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा