डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई आणि उपनगरात साचलेलं पाणी उपसा करण्याचं काम सुरु असून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टचे आदेश दिले आहेत. मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावं आणि यंत्रणांना सहकार्य कराव असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.  

 

मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने कालपासून हजेरी लावली आहे.  मुंबई मध्ये काल रात्री १ वाजल्यापासून आज सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं असून रस्ते आणि  रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 

मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच आज दुपारी दोनच्या सुमारास  समुद्रात सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता  आहे. हवामान खात्यानं मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा