डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महिला क्रिकेट मधे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज चेन्नईत रंगणार

 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ३ टी-२० सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळाला जाणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडिअमवर आज संध्याकाळी ७ वाजता हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत.

 

भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय महिलांनी पाहुण्या संघाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० नं पराभूत केलं होतं, तर दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं १० गडी राखून पाहुण्या संघाला धूळ चारली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा