राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्यांनी https://www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत असं आवाहन कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. ते आज पुणे इथं कौशल्य विकास दिंडी कार्यक्रमात बोलत होते. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट आहे.
रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायत स्तरावर टप्प्याटप्प्यानं कौशल्य विकास केंद्रं स्थापन करण्यात येतील, असं लोढा यांनी सांगितलं. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागानं आषाढी वारीसोबत पुण्याजवळ वानवडी इथं कौशल्य विकास दिंडी आयोजित केली होेती. त्यावेळी ते बोलत होते.