येत्या २ दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.