महायुती सरकारविरोधात काँग्रेसनं आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा आघाडीचं सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून मजा मारत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, महागाई, बेरोजगारीनं लोकांना जगणं कठिण झालं आहे. बियाणं आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचं भविष्य सरकारनं उद्धवस्त केलं आहे. म्हणून हे आंदेलन केल्याचं पटोले यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
ईव्हीएमवर देशभरातून ८ उमेदवारांनी आक्षेप नोंदवला त्यात भाजपाचे तीनजण आहेत. आतातरी भाजपा, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगानं गांभीर्य ओळखावं, आणि मतपत्रिकेवर मतदान घ्यावं असं ते म्हणाले.