प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेतील तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असून या कार्यक्रमाचा हा १११ वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसेच यूट्यूब चॅनेलवरून तसंच न्यूज ऑन एआयआर अॅपवर याचं थेट प्रसारण श्रोत्यांना ऐकता येणार आहे. त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषेतला अनुवादही प्रसारित होणार आहे.